मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडाने नियमात केले बदल

ठाणे : म्हाडाच्या घरासाठी (1 bhk projects in thane) अर्ज करणाऱ्या घटस्फोटित जोडप्यांना आतापासून डिक्री प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्या दृष्टीने म्हाडाने आपल्या ॲपमध्ये तसेच संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई बोर्डाच्या सोडतीतून हा नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (new construction in thane)

म्हाडाच्या सोडतीसाठी अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे वेगवेगळे उत्पन्न गट आहेत. अर्जदारांना ते ज्या उत्पन्न गटातील आहेत त्यानुसार घरांसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करताना पती-पत्नीच्या एकत्रित कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जातो. काही अर्जदार दोनपैकी फक्त एकाचे उत्पन्न दाखवून घरांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करतात. लॉटरीमध्ये घर जिंकल्यानंतर संयुक्त कुटुंबाचे उत्पन्न लपवण्यासाठी आम्ही वेगळे झालो आहोत, कोर्टात केस आहे, असे उत्तर देऊन म्हाडाची दिशाभूल करण्यात येते. त्यामुळे म्हाडाने हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. (1 bhk flat in thane)

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या मुंबई बोर्डाच्या सोडतीत अशी 77 प्रकरणे म्हाडाच्या निदर्शनास आली होती. अशा दिशाभूल करणाऱ्या अर्जदारांवर म्हाडाने कारवाई केली आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी म्हाडाने आता घटस्फोटित जोडप्यांना डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.

वाचा : नवी मुंबईत सिडकोचे 48 प्लॉट, 218 दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या नोंदणीस सुरुवात

Leave a Comment