girni kamgar गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर आता स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही शांत बसू देणार नाही. गिरणी कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह राज्यव्यापी भव्य मोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखवतील, अशी ग्वाही शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी दिली.
गिरणी कामगार girni kamgar घरांच्या प्रश्नावरील आणि गिरणी चाळीच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावर दिरंगाई करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र मिल मजदूर संघ आणि सेंच्युरी मिल मजदूर एकता मंच यांच्या गिरणी कामगार girni kamgarकृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
एनटीसी चाळ कृती समिती खाजगी गिरणी चाळ रहिवाशी मंडळ यांनी आंदोलनात सहभागी होऊन गिरणी कामगार लढ्याला संघर्षाची धार आणली होती. या प्रसंगी आपल्या भाषणात गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं समजलं.
ज्या लोकांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार चळवळीला समर्पित केले त्यांना राज्य सरकारने नियंत्रण समितीमध्ये भरती केले नाही. पात्रता ठरवणे हा कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
घरांची संख्या कमी करण्याचा सरकारचा विचार girni kamgar
याद्वारे घरांची संख्या कमी करण्याचा सरकारचा विचार असून, त्याविरोधात आता कर्मचाऱ्यांना अधिक संघटित करावे लागणार आहे. मिल चाळीच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर आम्ही दिल्लीत सचिव स्तरावर बैठक घेतली असून हा मुद्दाही आम्ही मांडला आहे. त्याला तूरडीस नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही सचिन अहिर म्हणाले.