नवी मुंबईत मिळणार 12 लाखात घर, पहा सिडकोच्या प्रकल्पाची प्रयाग सिटी येथील घरांची संपूर्ण माहिती

Cidco I गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नुकतीच सिडकोतील घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. पनवेल आणि पनवेल परिसरात ही घरे उपलब्ध आहेत. या ब्लॉगमध्ये आपण या घरांचा परिसर आणि या लॉटरीमधील प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत. सिडको च्या या लॉटरीत प्रयाग सिटी विहार हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नेमका कुठे आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे क्षेत्रफळ कोठे आहे? येथे घर खरेदी करणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आम्हाला विचारण्यात आले. तर आज येथे आपण प्रयाग सिटीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पनवेलपासून १५ किलोमीटर परिसरात सिडकोची ही घरे बांधली आहेत. प्रयाग सिटी हा प्रयाग बिल्डर आणि डेव्हलपर्सने बांधलेला प्रकल्प आहे. त्याचा महारेरा क्रमांक P52000004381 आहे आणि प्रकल्प स्थळ विहिघर पनवेल याठिकाणी आहे. या प्रकल्पात एकूण 55 घरे उपलब्ध आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) 10 घरे उपलब्ध आहेत आणि 45 घरे सामान्य श्रेणीतील निम्न उत्पन्न गटासाठी (LIG) उपलब्ध आहेत. या घरांची किंमत 12 ते 20 लाखांपर्यंत आहे. ही सर्व घरे तयार अवस्थेत आहेत.

हेही वाचा : mhada lottery pune : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज करण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

या प्रकल्पापासून पनवेल रेल्वे स्थानक ६ किमी अंतरावर आहे. डी मार्ट साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे, पिल्लई कॉलेज साडेसहा किलोमीटरवर आहे, हायवे ड्रॉप पॉइंट जो मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आहे तीन किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती अशी की, खासगी बिल्डरने वन बीएचके फ्लॅटची बाजारातील किंमत २८ लाख रुपये ठेवली आहे.

CIDCO
SOURCE INTERNET

तर २ BHK ची बाजारभाव 40 लाख रुपये आहे. पण या योजनेत तुम्हाला ही घरे 12 ते 20 लाखांमध्ये मिळू शकतात. ही घरे खरेदी करण्यासाठी तुम्हाला सिडकोचा ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही या घरांसाठी अर्ज करू शकता.

सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा

हेही वाचा : खुशखबर! आता नऊ लाखांच्या होम लोनवर मिळणार व्याज सब्सिडी, पहा कोण आणि कधी घेऊ शकणार लाभ..

Leave a Comment