1BHK : सिडकोतर्फे नवी मुंबईत सर्वांगीण विकास सुरू असतानाच आता हा परिसर मुंबईच्या मुख्य प्रवाहाशी सहज जोडला गेला आहे, त्यामुळे येथे राहायला आवडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि नव्याने साकारलेल्या नैना शहराच्या विकासासाठी मेट्रो, रस्ते आणि तत्सम प्रकल्पही आखले जात आहेत.
नेरुळ-उरण मार्गावर तरघर रेल्वे स्थानक ते आंबिवली आणि कळंबोली-चिखले-कोणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो सेवा देता येईल का, यावर लक्ष ठेवण्यासाठी सिडकोने काही दिवसांपूर्वी एक समिती स्थापन केली होती.
या मेट्रोमुळे पनवेल आणि उलवे भागाला मोठा फायदा होणार असून नैना शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे भविष्यात सिडकोच्या योजनेतील द्रोणागिरी आणि तळोजा नोड येथील घरांच्या किमतीही वाढणार आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी येथे क्लीक करा
सिडको योजनेच्या माहितीसाठी येथे क्लीक करा