Cidco Lottery : सिडको तर्फे सर्वसामान्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. सिडको कडून ७८४९ घरांची लॉटरी जाहीर करून एक मोठी भेट दिली आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये ही घरे आहेत. सिडकोने या सोडतीचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देखील मोठा फायदा हा होणार आहे. सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. इन हाऊस लॉटरीसाठी आता नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
सिडको ने जाहीर केलेली ७८४९ घरे नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए२बी आणि पी३, बामणडोंगरी येथे आहेत. हे घर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे लाईनजवळ आहे. मुंबईतील घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असतानाच आजूबाजूच्या शहरातील घरांच्या किमतीही आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे कठीण होत आहे. सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी घोषणा केली आहे.
नवी मुंबईत मिळणार 12 लाखात घर, पहा सिडकोच्या प्रकल्पाची प्रयाग सिटी येथील घरांची संपूर्ण माहिती
सिडकोच्या म्हणण्यानुसार, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासी संकुलात उच्च दर्जाच्या सुविधा असतील. निवासी संकुलांच्या परिसरात शाळा, रुग्णालय,महाविद्यालय आदी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.या व्यतिरिक्त २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देखील दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध होतील.
Cidco Lottery
घरांची नोंदणी करण्यासाठी येथे क्लीक करा
नवी मुंबई सिडको आणि पनवेल परिसरामध्ये तब्ब्ल एक लाख घरे देण्यात येणार असून आतापर्यंत सिडकोने सुमारे २५ हजार घरांची विक्री ही केलेली आहे. नुकताच गणेशोत्सव काळामध्ये सिडकोने ४ हजार १५८ घरे आणि २४५ व्यावसायिक भूखंडांची लॉटरी देखील जाहीर केलेली होती. आता कळंबोली,द्रोणागिरी, तळोजा आणि खारघर नोड्स येथील सिडको गृहनिर्माण संकुलामधील ४१५८ घरांची लॉटरी. त्यामधून ४०३ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवली होती. तर उर्वरित ३७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होती.