एग्रीमेंट चे रिन्यूअल न करताच घरमालक भाडे वाढवू शकतो का? जाणून घ्या काय आहे नियम

मुंबई : तुम्ही देशात कुठेही घर भाड्याने घेता तेव्हा, तुम्हाला भाडेकरारावर (Rent Agreement) करणे आवश्यक आहे. भाड्याच्या कराराशिवाय भाड्याच्या घरात राहणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाडेकरार केला जातो ज्यामध्ये अटी व शर्ती अंतिम केल्या जातात. भाडेकरार हा सहसा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील 11 महिन्यांचा करार असतो ज्यावर भाडे सुरु होण्याआधी भाडेकरार करणे आवश्यक आहे. यानंतर, दोघेही त्यांच्या सोयीनुसार पुन्हा सहा महिने किंवा 11 महिन्यांपर्यंत करार वाढवू शकतात.

मोठी शहरे आणि महानगरांमध्ये बहुतेक लोक नोकरी करत असताना भाड्याच्या घरात राहतात. अशा परिस्थितीत तुम्हीही भाड्याने राहत असाल किंवा भाड्याने घर किंवा फ्लॅट शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भाडे कराराशिवाय, घरमालक तुमच्याकडून भाडे किंवा जास्त पैसे मागू शकत नाही. भाडेपट्टी कायदा (लीज ॲक्ट) काय म्हणतो ते जाणून घेऊया…

या कायद्यात नियम काय सांगतो

लीज कायद्यानुसार कोणताही घरमालक भाडेकराराची नोंदणी केल्याशिवाय भाडेकरूकडून अतिरिक्त पैशांची मागणी करू शकत नाही. त्याच वेळी, करार पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरण न केल्यास, घरमालक तुमच्याकडून अधिक भाडे आकारू शकत नाही. भाडे वाढवण्यासाठी घरमालकाने जुन्या कराराचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल आणि त्यानंतरच तो भाडेकरूकडून अधिक भाडे आकारण्यास पात्र असेल.

घरमालक जास्त भाडे वाढवून देत असेल तर काय करायचे?

यापूर्वी अनेकदा असे दिसून आले आहे की मोठ्या शहरांमध्ये घरमालक हवे तेव्हा भाडे वाढवतात, जे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाड्यापासून सुविधांपर्यंत सर्व गोष्टींवरून वाद झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे जर तुमचा घरमालक तुम्हाला जास्त भाडे मागत असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. यासाठी भाडेकरू घरमालकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भाडे नियंत्रण कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू शकतो. तसेच,जास्त भाडे न दिल्याने तो तुम्हाला घराबाहेरही काढू शकत नाही.

वाचा : मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK’चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे

1 thought on “एग्रीमेंट चे रिन्यूअल न करताच घरमालक भाडे वाढवू शकतो का? जाणून घ्या काय आहे नियम”

Leave a Comment