म्हाडा वसाहतींची mhada colony चर्चा किंवा सोडतीसाठी सुरुच असते. पण, याच म्हाडा कॉलनीत mhada colony एक धक्कादायक घटना समोर आल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. विरारमधील म्हाडाच्या वसाहतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली. त्यानंतर नालासोपारा अनैकिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका व्यक्तीला अटक केली. उपलब्ध माहितीनुसार, दोन 23 वर्षीय बांगलादेशी मुलींसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? mhada colony
अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असून त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आता पोलीस यंत्रणाही त्याचा शोध घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील म्हाडाच्या एका मोठ्या वसाहतीत mhada colony असे काम सुरू होते.
म्हाडा कॉलनी, mhada colony विरारमध्ये असलेल्या डी-७ इमारतीतील खोली क्रमांक २१०४ मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती अधिकार्यांना मिळाली. जिथे आरोपी अशोक दास (54) हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने बांगलादेशातून अल्पवयीन मुलींची अवैध फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसायासाठी मुंबईत आणत होता. तो या मुलींना विरार येथील एका यॉट फ्लॅटमध्ये ठेवायचा आणि नंतर ग्रँट रोड परिसरातील रेड लाईट एरियात पाठवायचा, असे तपासात समोर आले आहे.
अनैतिक वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या दोन वर्षांत 300 हून अधिक मुलींची फसवणूक करून त्यांना मुंबईत आणले आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.