नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेत सिडको व्यवस्थापन आणि जमीन विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर सिडकोची जमीन विक्री प्रकरण चर्चेत आले. आधिवेशन संपल्यानंतर सिडको मंडळाने उद्योग व तारांकित हॉटेल्ससाठी निवासी वापरासाठी 48 भूखंड आणि 218 दुकानांच्या विक्रीसाठी लॉटरी योजना जाहीर करून सिडकोची भूखंड विक्री योजना नियमानुसार सुरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेची ऑनलाइन नोंदणी 6 जुलैपासून सुरू झाली असून दुकान विक्री योजनेची ऑनलाइन नोंदणी 16 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम 8 महिन्यांत सुरू होणार असल्याने नवी मुंबईतील जमिनीच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे सिडकोने भूखंड आणि दुकाने विकण्याची योजना जाहीर केली आहे. हे प्लॉट आणि दुकाने नवी मुंबईतील घणसोली, नेरुळ, सीबीडी बेलापूर, खारघर, कोपरखैरणे, कळंबोली, पनवेल (पूर्व) आणि पनवेल (पश्चिम) नोड्समध्ये आहेत.
भूखंड आणि दुकाने विकण्याची योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा
भूखंड: सेवा उद्योग आणि तारांकित हॉटेल वापरासाठी 48 भूखंड ई-निविदा, ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विकले जाणार आहेत. यासाठी गुंतवणूकदार https:// eauction. cidcoindia. com ला भेट देऊ शकतात.या वेबसाईटवरून तुम्हाला माहिती मिळू शकते. ऑनलाइन नोंदणीचा कालावधी 8 ते 23 जुलै असा असेल आणि योजनेचा निकाल 25 जुलै रोजी जाहीर केला जाईल.
भूखंड आणि दुकाने विकण्याची योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा
खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलासह नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली, घणसोली, खारघर आणि द्रोणागिरी नोडमधील निवासी संकुलातील 218 दुकाने ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ई-टेंडरिंग आणि ई-ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी https:// eauction. cidcoindia. com ला भेट द्यावी. या संकेतस्थळावर सिडकोकडून माहिती देण्यात आली आहे. या योजनेची ऑनलाइन नोंदणी 16 जुलैपासून सुरू होणार असून 20 ऑगस्ट रोजी योजनेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
1 thought on “नवी मुंबईत सिडकोचे 48 प्लॉट, 218 दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या नोंदणीस सुरुवात”