म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Mhada Mumbai Lottery 2024

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाने गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. यापूर्वी म्हाडाच्या घरांसाठी विविध प्रकारची सुमारे 21 कागदपत्रे आवश्यक होती. मात्र, आता फक्त 5 कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. तसेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना ही कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे आता घरांचे वाटप करण्यापासून घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील वेळ वाचणार आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केल्यानंतर लॉटरी जिंकल्यास ठराविक दिवसांत कागदपत्रे म्हाडाकडे जमा करावी लागतात. या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच संबंधित विजेत्याला अलॉटमेन्ट लेटर देण्यात आले. मात्र, घरे मंजूर झाल्यानंतर काही अर्जदारांना अपूर्ण कागदपत्रांमुळे घरे नाकारण्यात येत होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील पुढील व्यक्तीला घर द्यावे लागत होते. याशिवाय प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीलाही कागदपत्रांची पूर्तता करायची होती. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने म्हाडाने कागदपत्रांची संख्या कमी करून पडताळणीची प्रक्रियाही ऑनलाइन केली आहे.

एखाद्याला लॉटरी लागली तरी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने संबंधित व्यक्ती अपात्र ठरते. त्यामुळे अनेक घरे रिकामी राहिली आहेत. त्यामुळे म्हाडाने कागदपत्रांची संख्या कमी केली आहे. आता ऑनलाइन सुविधेमुळे अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी जलदगतीने करता येणार आहे. ही कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये ठेवली जातील. घर मिळाल्याची माहिती अर्जदाराला एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल.

लॉटरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड(मोबाईल नंबरला लिंक असलेले)
2) पॅन कार्ड(मोबाईल नंबरला लिंक असलेले)
3) उत्पनाचा दाखला सन 2022-2023 बारकोड असलेला किंवा ITR assessment Year 2023-2024
4) अधिवास प्रमाणपत्र / Domicile 1 जानेवारी 2018 नंतरचे काढलेले असावे.
5) लग्न झाले असल्यास जोडीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड

आरक्षण प्रमाणपत्रे

# राखीव जागा असल्यास खालील प्रमाणपत्र आवश्यक आवश्यक कागदपत्रेव त्यासंबंधित प्रक्रिया संबंधित कार्यालय
1 SC/ST/NT/DT जात प्रवर्गनिहाय उपलब्ध प्रमाणपत्रेupload करावी सक्षम प्रधीकार्याने मंजूर केलेली प्रमाणपत
2
पत्रकार
लॉटरीमध्ये certificate Generation पर्याय वापरून पत्रकाराचे आवश्यक कागदपत्रे upload करावे आणि त्याची पात्रता मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याकडून निश्चित करण्यात येईल
मुख्य जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)
3 स्वातंत्र्य सैनिक लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. जिल्हाधिकारी कार्यालय
4 अपंग व्यक्ती UDID Card अपलोड करावे swavlambancard.gov.in द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र/ UID काडा
5 संरक्षण दल लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. जिल्हा सैनिक कल्याण मंडळ/ संबंधीत संरक्षण अधिकारी
6 माजी सेंनिक लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. जिल्हा सैनिक कल्याण मंडळ/ संबंधीत संरक्षण अधिकारी
7 लोकसभा,विधानसभा,विधानपरिषद सदस्य लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. सक्षम अधिकारी/प्राधिकारी
8 म्हाडा कर्मचारी म्हाडा कर्मचारी ओळखपत्र असलेले कर्मचारी क्र. अपलोड करावे म्हाडा कर्मचारी ओळखपत्र असलेले कर्मचारी क्र.
9 राज्य शासन कर्मचारी लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. संबंधित विभागाचे सक्षम अधिकारी
10 केंद्र शासन कर्मचारी लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. संबंधित विभागाचे सक्षम अधिकारी
11 कलाकार लॉगिनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सही व शिक्का आणावा. कला/ सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन

वाचा : लॉटरी पूर्वीच झाले म्हाडाचे विजेते..! पाहा विजेत्यांची नावे । Mhada lottery result

1 thought on “म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Mhada Mumbai Lottery 2024”

Leave a Comment