नवी मुंबई : स्वतःचे मुंबईत घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर घेण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडको आणि म्हाडासारख्या संस्था अश्या लोकांना मदत करतात. नवी मुंबई आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये प्राइम लोकेशन्सवर परवडणारी घरे शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. आता नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सिडकोने 3322 नवीन सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडकोनवे जानेवारी गृह निर्माण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, तळोजा येथील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोड यांना जोडणारा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू MTHL च्या आसपास प्राइम लोकेशन्सवर 3322 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, या महागृह निर्माण योजनेची ऑनलाइन अर्ज नोंदणी 26 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज करायची शेवटची तारीख ही उद्या म्हणजेच 26 मे आहे. 27 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत.
सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेंतर्गत 3322 घरांपैकी द्रोणागिरी नोडजवळ 61 आणि तळोजा नोडजवळ 251 घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 312 घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, द्रोणागिरीतील 374 आणि तळोजामधील 2636 घरांसह 3010 घरे इतर सामान्य घटकांसाठी उपलब्ध राहतील. ही घरे तुम्ही खालील व्हिडिओत बघू शकतात.
कसा करायचा अर्ज?
ऑनलाइन नोंदणीसाठी आणि सिडकोने जाहीर केलेल्या या योजनेच्या माहितीसाठी तुमही खालील लिंकवर क्लीक करून माहिती पाहू शकतात.
ऑनलाइन नोंदणीसाठी येथे क्लीक करा
सिडको योजनेच्या माहितीसाठी येथे क्लीक करा
वाचा : पुण्यातील म्हाडाची 1BHK आणि 2BHK घरांची सविस्तर माहिती, किंमत 14 लाखांपासून