Mhada Lottery 2024: फ्लॅट घेताना ही महत्त्वाची कागदपत्रे तपासा, नाहीतर होऊ शकते फसवणूक..!

Mhada Lottery 2024 आजकाल मुंबईत चांगलं घर घेण्यास लोकांना खूप रस आहे. कारण मुंबईत घर घेणे ही सध्या सामान्य गोष्ट राहिलेली नाही. मुंबईत रोजगार आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने दर्जेदार जीवन जगण्यासाठी काही लोक मुंबईत राहणे पसंत करतात.सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना मुंबईमध्ये घर घेणे थोडे अवघड जाते.घराच्या किमती वाढल्याने त्यांना घर घेण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये घर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा घर घेताना तुमची फसवणूक होऊ शकते. आणि तुमची आजीवन बचत एका क्षणात नाहीशी होऊ शकते. यासाठी घर घेताना आवश्यक कागदपत्रे तपासून फसवणूक टाळता येईल.

जर तुम्ही आज घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया अपडेट..

नवीन घर घेताना या गोष्टी लक्षात ठेवा Mhada Lottery 2024

(१) जर तुम्हाला फ्लॅट किंवा घर घ्यायचे असेल, तर नेहमीच आधी कन्फर्म केलेली रजिस्ट्री तपासा.

(२) कमेन्समेंट सर्टिफिकेट: अनेक लोक अशा ठिकाणी फ्लॅट विकत घेतात जिथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे त्या वेळी कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजेच बांधकाम मंजुरी प्रमाणपत्र तपासले पाहिजे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या मंजुरीनंतरच बांधकाम होत असल्याचे या प्रमाणपत्रावरून स्पष्ट झाले आहे.

(३) भोगवटा प्रमाणपत्र (OC प्रमाणपत्र): सोसायटीमध्ये सदनिका खरेदी करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच OC प्रमाणपत्र हे तपासले पाहिजे. गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक प्रशासन हे प्रमाणपत्र जारी करत असते. तुम्ही ज्या इमारतीत सदनिका विकत घेत आहात ती पूर्णपणे कायदेशीर असल्याचे या प्रमाणपत्रावरून दिसून येत असते.

(४) मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य तुम्हाला माहीत असावे. जर तुम्हाला याची जाणीव नसेल तर तुम्हाला जास्त किंमतीत स्वस्त मालमत्ता मिळू शकते. तर वर्तमान मूल्य काय आहे ते शोधा.

(५) आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तुम्ही ती कायदेशीर तज्ञ आणि मालमत्ता व्यवहाराचा अनुभव असलेल्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

हेहि वाचा : girni kamgar : आता गिरणी कामगार स्वस्थ बसणार नाहीत; विधानभवनावर‌ थेट महामोर्चा

Leave a Comment