Mhada Lottery 2024: कोणतीही संधी सोडू नका; मुंबईत मोठ्या घराची लॉटरी, ही कागदपत्रे ठेवा तयार..!

Mhada Lottery 2024 मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभाग लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा विचार आहे.

मुंबई मंडळाची शेवटची लॉटरी गेल्या वर्षी जाहीर झाली असून या सोडतीत म्हाडाची ४०८२ घरे होती. या घरांसाठी १.२२ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सोडतीत घरे न मिळालेल्या लोकांना म्हाडाच्या पुढील लॉटरीची प्रतीक्षा होती. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तयार घरांची माहिती गोळा केली जात आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत सुमारे दोन हजार घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घरांची लॉटरीसाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आगामी मुंबई लॉटरीमध्ये तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे तयार ठेवावी लागतील.चला जाणून घेऊया यासंदर्भात माहिती..

म्हाडाच्या या पुढील सोडतीत गोरेगावमधील पंचतारांकित सुविधा असलेल्या इमारतींच्या सुमारे ३३२ घरांचा समावेश होणार आहे. ही घरे मध्यम व उच्च वर्गासाठी असतील. वरच्या श्रेणीतील घरे अंदाजे 979 चौरस फूट असतील आणि मध्यम श्रेणीची घरे 714 चौरस फूट असतील. यामध्ये मध्यमवर्गीय घरांची किंमत सुमारे 80 लाख रुपये आणि उच्च वर्गाच्या घरांची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

म्हाडाकडून प्रथमच गोरेगाव येथील इमारतीत जिम, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट आणि स्विमिंग पूलची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या घरांचे बांधकाम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यांत ही घरे तयार होतील.

ही कागदपत्रे तयार ठेवा Mhada Lottery 2024

मुंबईत स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक म्हाडात अर्ज करतात. लॉटरीत म्हाडाचे घर मिळविण्यासाठी अर्जदाराकडे ७ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही सात कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत – (1) आधार कार्ड, (2) पॅन कार्ड, (3) निवास प्रमाणपत्र, (4) उत्पन्नाचा दाखला, (5) प्रतिज्ञापत्र, (6) जातीचे प्रमाणपत्र आणि (7) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वर्ग प्रमाणपत्राचा लाभ, तुम्ही ते म्हाडाच्या वेबसाइटवर तयार ठेवू शकता आणि नोंदणी करू शकता.

हेही वाचा :  Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; पहा मोक्याच्या ठिकाणी घरे ?

Leave a Comment