MHADA Lottery: म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) MHADA Lottery pune पुणे मंडळाने गेल्या महिन्यात विविध उत्पन्न गटातील घरांसाठी सोडत जाहीर केल्या होत्या. मात्र, नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे सोडतीला ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढली आहे. आता या सोडतीत 4 हजार 877 घरांचा समावेश होणार आहे.

ही सोडत म्हाडाने गेल्या महिन्यात जाहीर केली होती. यासाठी या सोडतीसाठी ८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र, या योजनेत केवळ 16 हजार अर्ज आल्याने म्हाडाला ही योजना अनिश्चित काळासाठी वाढवावी लागली.

आता ही वेळ मर्यादा 30 मे रोजी रात्री 11 ते 59 वाजेपर्यंत असणार आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नागरिकांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. आणि ”प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे.

अशी असणार आहे सोडत MHADA Lottery

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यः २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना : १८
  • म्हाडा प्रधानमंत्री आवास (PMAY) योजना: 59
  • प्रधानमंत्री आवास (PMAY) खाजगी भागीदारी योजना (PPP): 978
  • पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवडचा 20 टक्के आराखडा: 1406
  • एकूण 4 हजार 877 सदनिका

Leave a Comment