म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये २४ हजार अर्जदार पात्र,इथे पहा संपूर्ण यादी

मुंबई: म्हाडाच्या कोकण mhada konkan lottery 2023 विभागामधील 5,311 घरांपैकी 2,970 या घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेमधील घरे वगळता) अर्जांची अंतिम यादी ही सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीनुसार जमा रकमेसह प्राप्त झालेल्या 24 हजार 303 अर्जांपैकी 303 अर्ज अपात्र ठरले असून 24 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत आता 24 हजार अर्जदार सोडतीत सहभागी होणार आहेत. सोडतीतील अर्जांची अंतिम यादी जाहीर झाली असली तरी सोडतीची तारीख अद्याप ठरलेली नाही.

कोकण विभागाच्या सोडतीसाठी mhada konkan lottery 2023 पंतप्रधान मंत्री आवास योजना, प्रथम प्राधान्य, 15 टक्के एकात्मिक योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण यासारख्या योजनांअंतर्गत 5311 घरांसाठी अर्ज-मंजुरी प्रक्रिया 5 सप्टेंबरपासून सुरू झाली. ही प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या कालावधीत 31 हजार 433 उमेदवारांनी अर्ज भरले. त्यापैकी 24 हजार 755 जणांनी सुरक्षा ठेवीसह अर्ज सादर केले.

अर्जदार प्रत्यक्ष सोडतीत सहभागी होणार mhada konkan lottery 2023

या अर्जांची छाननी केल्यानंतर, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत 2000 हून अधिक घरांसाठीचे अर्ज वगळून उर्वरित 2970 घरांसाठी अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 24 हजार 303 अर्जांपैकी 1700 अर्ज अपात्र घोषित करण्यात आले. या अपात्र अर्जांवर आलेल्या हरकती लक्षात घेऊन सोमवारी 2970 घरांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. mhada konkan lottery 2023 यामध्ये 303 अर्ज अपात्र ठरले असून 24 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत आता 2970 घरांसाठी 24 हजार अर्जदार प्रत्यक्ष सोडतीत सहभागी होणार आहेत.

पात्र अर्जदारांची संपूर्ण यादी बघण्यासाठी येथे क्लीक करा

प्रथम प्राधान्यमधील 2200 हून अधिक घरांसाठी अद्याप अर्ज स्वीकारले जात आहेत. शेवटचे घर विकले जाईपर्यंत हा अर्ज-विक्री-स्वीकृती सुरू राहील. त्यामुळे 5311 घरांपैकी 2970 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. मात्र सोडतीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळेच आता सोडतीच्या तारखेकडे अर्जदारांचे मोठ्या प्रमाणात ,लक्ष लागले आहे.

हेही वाचा: म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा काळाबाजार ; समोर आलं धक्कादायक वास्तव

Leave a Comment