म्हाडाची ४५०० घरांची लॉटरी..! मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती MHADA lottery Aurangabad 2023

MHADA lottery Aurangabad 2023: :स्वतःचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. या घरांसाठी अनेक मंडळी दीर्घकाळापासून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. शेवटी, जेव्हा घराचे हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा आनंदाला सीमा नसते. अशा परिपूर्ण घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आता म्हाडाचा आणखी एक प्रकल्प तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावणार आहे.

अतुल सावे म्हणाले की, संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये म्हाडाचा सुमारे 4500 घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील ऑरिक शहरातील म्हाडाच्या अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी हा प्रकल्प प्रस्तावित असून नागरिकांसाठी ४५०० घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. म्हाडाच्या या प्रकल्पाबाबत सांगितले जात आहे की, वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधा तयार झाल्यामुळे हा प्रकल्प म्हाडाला कामगार वसाहतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या दरम्यान, प्रस्तावित जागेच्या दराबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी एका माध्यम समूहाशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आणला जाईल.

कामगारांसाठी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार MHADA lottery Aurangabad 2023

ओरिक सिटीने नागरी वसाहतींसाठी जमीन विकसित केली असल्याने संबंधित 7.50 हेक्टर जमीन म्हाडाकडून संपादित केली जाणार आहे. त्यानंतर अल्प व मध्यम उत्पन्न गटातील कामगारांसाठी येथे स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात म्हाडाकडून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

फ्लॅट घेण्यासाठी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

म्हाडाच्या या प्रकल्पाचा फायदा अनेकांना होणार असून आता येत्या काळात अनेकांना हे होताना दिसेल. केवळ संभाजीगडच नव्हे तर शहरी भागातही म्हाडाच्या अनेक प्रकल्पांमुळे अनेकांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. येत्या काळात या म्हाडाकडून कोणत्या भागात लॉटरी काढली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा : म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय,विक्रीसाठी खासगी संस्थांची घेतली जाणार मदत Mhada Lottery 2023

Leave a Comment