मुंबईत फक्त 9 लाखात मिळवा हक्काचे घर, जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर? Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : मुंबई सारख्या शहरात स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असत, परंतु आजच्या महागाईच्या युगात जमीन खरेदी करून त्यावर इमारत बांधण्यासाठी होणारा प्रचंड खर्च प्रत्येकाच्या आवाक्यात नसतो.आणि मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे .कारण तुम्ही आता तुमच्या बजेटमध्ये मुंबईजवळ घर घेऊ शकणार आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) हजारो परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

सर्वात महाग अपार्टमेंट 9 ते 49 लाख रुपयांच्या दरम्यान मिळणार म्हाडाची घरे

म्हाडाने सोडत जाहीर केलेल्या यादीनुसार, ज्या ज्या परवडणाऱ्या घरांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ती घरे मुंबईजवळील टिटवाळा, वसई, विरार, ठाणे, कल्याण, मुंब्रा येथे उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या किमतींबद्दल बघितलं तर त्यांची श्रेणी हि 9 लाखांनपासून ते 49 लाखांनपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. म्हाडाच्या म्हणण्यानुसार, लॉटरी अंतर्गत मुंबईजवळ विकल्या जाणाऱ्या घरांपैकी सगळ्यात स्वस्त सदनिका वसईमध्ये 9 लाख रुपयांना तर सर्वात महाग सदनिका विरारमध्ये 49 लाख रुपयांना मिळणार आहे. सुवर्णसंधी; म्हाडा पाठोपाठ सिडकोकडूनही नवी मुंबईत सर्वसामान्यसाठी घरे,तळोजा, सीवूड, खारघर, जुईनगर, खांदेश्वरचे प्रकल्प समाविष्ट cidco lottery 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित

म्हाडाच्या कोकण विभागाने मुंबईजवळील ठाणे, पालघर आणि रायगडसह काही ठिकाणी लॉटरीद्वारे परवडणाऱ्या घरांची विक्री जाहीर केली आहे. यापैकीच 1,000 पेक्षा ज्यास्त घरे हे प्रधानमंत्री आवास योजना (PM आवास योजना) म्हणजेच PMAY द्वारे घेता येणार आहे.मिळालेल्या माहिती नुसार, या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर पर्यंत निश्चित करण्यात आलेली असून 17 नोव्हेंबरपर्यंत देयके स्वीकारली जातील. यासोबतच या लॉटरीचा निकाल 13 डिसेंबरला जाहीर केला जाईल.

Mhada Lottery 2023

हेही वाचा : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ Mhada Lottery 2023

जर क्षेत्रफळाबद्दल बघितलं तर सर्वात लहान अपार्टमेंट 258 स्क्वेअर फूट असणार आणि सर्वात मोठे अपार्टमेंट 667 स्क्वेअर फूट असणार. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in/ ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

तसेच मुंबई लॉटरीच्या महिनाभरानंतर म्हाडाने पुणे येथेही नवी योजना जाहीर केली आहे. पुणे मंडळाने पुणे, सोलापूर,कोल्हापूर आणि सांगली इथेही 5,863 बजेट घरे विकण्यासाठी लॉटरी जाहीर केलेली आहे. या 5,863 घरांपैकी 2,445 घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जात आहेत.

हेही वाचा : पुणेकरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार! आता लॉटरी शिवाय पुण्यात घेता येणार म्हाडाचे घर mhada pune lottery

1 thought on “मुंबईत फक्त 9 लाखात मिळवा हक्काचे घर, जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर? Mhada Lottery 2023”

Leave a Comment