खुशखबर! आता नऊ लाखांच्या होम लोनवर मिळणार व्याज सब्सिडी, पहा कोण आणि कधी घेऊ शकणार लाभ..

Home Loan Subsidy Scheme : आता मुंबईसारख्या मोठ्या शहरात किंवा छोट्या गावात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता केंद्र सरकार छोट्या कुटुंबांसाठी गृहकर्ज अनुदान योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा अल्प उत्पन्न गटातील २५ लाख लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या अनुदानाची रक्कम अद्याप ठरलेली नाही, कारण कुटुंबांच्या मागणीवर अनुदानाची रक्कम अवलंबून राहणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळेल का? पहा सविस्तर माहिती.. Home Loan Subsidy Scheme

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मोदी सरकार या योजनेअंतर्गत पाच वर्षांत सुमारे ६०,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. या अंतर्गत गृहकर्ज अर्जदारांना २५ लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही.

योजनेचा कोणाला मिळणार लाभ ?

२०२३ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की सरकार एका नवीन योजनेद्वारे शहरांमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज देईल. या योजनेचा फायदा भाड्याची घरे, झोपडपट्टी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना होईल, असे पंतप्रधान म्हणाले होते. Home Loan Subsidy Scheme

लोन अमाउंट आणि व्याज सब्सिडी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या नवीन योजनेद्वारे ९ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. आणि हे वार्षिक ३ किंवा ६.५ टक्के पर्यंत व्याज अनुदान असू शकते. Home Loan Subsidy Scheme

योजनेसाठी पात्रता काय असावी?

अहवालात असे म्हटले आहे की २० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्जावर ही सबसिडी मिळू शकते. व्याज सवलत लाभार्थीच्या गृहकर्ज खात्यात जमा केली जाऊ शकते. त्याला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळू शकते.

हेही वाचा : Mhada I म्हाडाच्या सेवेतील निवासस्थानांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी म्हाडा संघ आग्रह कायम

Leave a Comment