Viral Video नियम ते काय असतं? गावात रंगला ‘खो-खो’चा खेळ; पण VIDEO चा शेवट तुम्हाला पोट धरून हसवेल

नियम ते काय असतं? गावात रंगला ‘खो-खो’चा खेळ; पण VIDEO चा शेवट तुम्हाला पोट धरून हसवेल

Viral Video Shows Funny Kho-Kho Game : एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळताना तेथील नियमसुद्धा पाळावे लागतात, पण जेव्हा आपण चाळीत, टेरेस किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा गावात खेळ खेळतो, तेव्हा आपणच परीक्षक आणि आपणच खेळाडू असतो; त्यामुळे इथे कोणी नियम तयार केले तरीही ते पाळलेच जातील हे मनात धरून चालणेच चुकीचे असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. यामध्ये गावाकडे खो-खो हा खेळ रंगलेला दिसतो आहे, जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

व्हायरल व्हिडीओत (Video)तुम्ही पाहू शकता, गावातील मंडळी खो-खो खेळ खेळताना दिसत आहेत. अगदी लहान मुले ते महिलांपर्यंत अनेक जण यात सहभागी झाले आहेत. पुरुष मंडळी प्रेक्षक म्हणून हा खेळ पाहत असतात. खेळाला सुरुवात होते आणि सगळे एकमेकांना खो देत डाव असणाऱ्या महिलेला जीव तोडून पकडण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात खेळाडूंमधील एक मुलगा एका आजीला खो देतो. त्यानंतर काय घडते हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Leave a Comment