Video Shows Two Pet Dogs अरे, मन जिंकलंस! आजीच्या भजनाला पाळीव प्राण्यांची साथ! VIDEO पाहून म्हणाल, ‘लाडके श्वान…’ April 16, 2025 by admin Video Shows Two Pet Dogs Join Grandma’s Bhajan : घरात पाळीव प्राण्यांना आणण्यास मोठ्या मंडळींकडून नेहमी नकार दिला जातो. कारण- घरात एखादा पाळीव प्राणी आणला, तर आपली जबाबदारी खूप वाढते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही घरात प्राणी पाळत नाहीत. असे असले तरीही काही जण हट्टापायी घरात या प्राण्यांना आणतात. मग काही दिवसांतच मोठी मंडळी त्यांना आपलंसंसुद्धा करतात आणि घरात ते सगळ्यांचे लाडके होतात. तर, हेच दृश्य दाखविणारा आजचा व्हायरल व्हिडीओ (Video) आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावरही आनंद येईल. पूर्वी भजन, जुनी गाणी म्हटलं की, आपल्यातील अनेकांना कंटाळा यायचा. पण, बदलत्या काळात अनेकांना भजन, कीर्तन ऐकायला आणि मंदिरांना भेट द्यायला पुन्हा एकदा आवडायला लागले आहे. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. गॅलरीत बसून आजी भजन गाते आहे आणि तिचे भजन ऐकायला घरातील दुसरे-तिसरे कोण नाही, तर त्यांच्या घरातील पाळीव श्वान आले आहेत. आजी भजन गाताना पाळीव श्वानांनी कशी साथ दिली ते व्हायरल व्हिडीओतून (Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
Video Shows Two Pet Dogs Join Grandma’s Bhajan : घरात पाळीव प्राण्यांना आणण्यास मोठ्या मंडळींकडून नेहमी नकार दिला जातो. कारण- घरात एखादा पाळीव प्राणी आणला, तर आपली जबाबदारी खूप वाढते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही घरात प्राणी पाळत नाहीत. असे असले तरीही काही जण हट्टापायी घरात या प्राण्यांना आणतात. मग काही दिवसांतच मोठी मंडळी त्यांना आपलंसंसुद्धा करतात आणि घरात ते सगळ्यांचे लाडके होतात. तर, हेच दृश्य दाखविणारा आजचा व्हायरल व्हिडीओ (Video) आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावरही आनंद येईल. पूर्वी भजन, जुनी गाणी म्हटलं की, आपल्यातील अनेकांना कंटाळा यायचा. पण, बदलत्या काळात अनेकांना भजन, कीर्तन ऐकायला आणि मंदिरांना भेट द्यायला पुन्हा एकदा आवडायला लागले आहे. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. गॅलरीत बसून आजी भजन गाते आहे आणि तिचे भजन ऐकायला घरातील दुसरे-तिसरे कोण नाही, तर त्यांच्या घरातील पाळीव श्वान आले आहेत. आजी भजन गाताना पाळीव श्वानांनी कशी साथ दिली ते व्हायरल व्हिडीओतून (Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…