या’ दिशेने जेवत असाल तर लगेच व्हा सावध, तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी? वास्तूशास्त्र काय सांगते जाणून घ्या…vastu shastra

vastu shastra : घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. घराबाबत प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असते. प्रत्येकाला आपले घर परिपूर्ण असावे असे वाटते. घर कसे असावे आणि घरातील प्रत्येक दिशा व स्थानाचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्न खाताना पाळायचे नियमही सांगितले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की जेवणासाठी कोणत्या दिशेला बसावे आणि कोणत्या दिशेला जेवायला बसू नये.

कोणत्या दिशेने जेवण करायला बसावे?

वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जेवण करण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशेला बसावे. जेवणासाठी ही दिशा शुभ मानली जाते तर दक्षिण दिशा अत्यंत अशुभ मानली जाते. शास्त्रानुसार दक्षिण दिशेला जेवायला बसू नये, अन्यथा अनेक समस्या उद्भवू शकतात.

कोणत्या दिशेने जेवण करण्यासाठी बसू नये?

जेवायला कधीही पश्चिम दिशेला बसू नका. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला बसून जेवण केल्याने कर्ज वाढते. त्यामुळे या दिशेला तोंड करून कधीही बसू नये, अन्यथा आर्थिक समस्या वाढू शकतात, असे मानले जाते.

(येथे दिलेली माहिती हीप्राप्त माहितीवर आधारित आहे .)

हेही वाचा : कोणत्या दिशेला दिवा लावल्यास फायदा होतो? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा I Vastu Tips

Leave a Comment